Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T11:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Online Class Survey: ऑनलाइन शिक्षणावर ४३ टक्के शिक्षक नाखूष Rojgar News

Advertisement
Survey: देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालयांचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर साधारण दीड वर्षापासून ऑनलाइन वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम शिक्षक करत आहेत. या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना देणाऱ्या शिक्षकांसोबत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. किती टक्के शिक्षक ऑनलाईन वर्गावर समाधानी नाहीत? हा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान शिक्षकांना विचारण्यात आला. यामध्ये साधारण ४३ टक्के शिक्षकांनी करोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिकवणी देण्यावर समाधानी नसल्याचे सांगितले. तर नऊ टक्के शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण माध्यमाबाबत पूर्ण असंतोष व्यक्त केला आहे. दिल्ली कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (DCPCR)च्या 'चिल्ड्रन फर्स्ट: जर्नल ऑन चिल्ड्रन्स लाइव्ह्स' च्या पहिल्या जर्नलमध्ये सर्वेक्षण छापून आले आहे. यावरुन ऑनलाइन शिक्षणावर शिक्षक नाखूष असल्याचे दिसून येत आहे. प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणात एकूण २२० शालेय शिक्षकांनी भाग घेतला. करोना काळात ऑनलाईन शिकवणी घेताना विद्यार्थ्यांची अनुपस्थिती १४ टक्के, विशेष गरजा असलेल्या मुलांचा विचार न करणे २१ टक्के, कमी लक्ष देणे २८ टक्के, भावनिक समस्या उघड करणारे विद्यार्थी १९ टक्के) ) आणि विद्यार्थी असाइनमेंट अपूर्ण ठेवण्याच्या मुद्द्यांचा या सर्वेक्षणात समावेश आहे. या काळामध्ये आम्हाला ऑनलाइन भावनात्मक सहकार्य मिळाले. समुपदेशकांशी सामूहिक संवाद साधता आला.तसेच सामाजिक कार्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षणात अधिक सहभागी होण्यास मदत झाली असल्याचे ऑनलाइन वर्ग सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी असेही सांगितले. पालकांचा सहभाग आवश्यक शालेय शिक्षणात पालकांचा सहभाग अत्यावश्यक झाला आहे. त्यांची परवानगी असेल तरच मुलांना नियमित वर्गात प्रवेश मिळणार आहे.विद्यार्थ्यांना थेट सहभागी करून ऑफलाइन शिक्षणावर शिक्षकांनी भर दिला.मित्रांना भेटणे आणि लोकांशी संवाद साधणे यासारख्या अनेक शालेय उपक्रमांना आम्ही ऑनलाइन क्लासमुळे मुकलो असे विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणादरम्यान सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/310q735
via nmkadda