Railway Recruitment 2021: रेल्वेत ४१०३ पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Railway Recruitment 2021: रेल्वेत ४१०३ पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Railway Apprentice Recruitment 2021: दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अंतर्गत विविध युनिटमध्ये एसी मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि इतर ट्रेडच्या एकूण ४१०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ४ ऑक्टोबरपासून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशीलही नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ट्रेडनुसार पदाचा तपशील एसी मेकॅनिक: २५० पदे कारपेंटर : १८ पदे डिझेल मेकॅनिक: ५३१ पदे इलेक्ट्रीशियन: १०१९ पदे फिटर: १४६० पोस्ट इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ९२ पदे मशीनिस्ट: ७१ पोस्ट एमएमटीएम: ५ पदे एमएमडब्ल्यू: २४ पदे पेंटर : ८० पद वेल्डर: ५५३ पद कोण करु शकेल अर्ज ? उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५० टक्के गुणांसह १० वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १५ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वय मोजले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पात्रता निकषांवरील तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठीअधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. येथे करा ऑनलाईन अर्ज उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in च्या होमपेजवर उपलब्ध अप्रेंटिस ट्रेनिंग २०२१ च्या ऑनलाईन अर्ज लिंकद्वारे अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yg9bnO
via nmkadda

0 Response to "Railway Recruitment 2021: रेल्वेत ४१०३ पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel