इंजिनीअरिंगची ५५७ महाविद्यालये बंद; वाढत्या रिक्त जागांचा परिणाम Rojgar News

इंजिनीअरिंगची ५५७ महाविद्यालये बंद; वाढत्या रिक्त जागांचा परिणाम Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग अभ्यासक्रमातील रिक्त जागांची वाढती संख्या लक्षात घेता, गेल्या चार वर्षांपासून देशातील बंद होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी गेल्या सहा वर्षांत देशातील सुमारे ५५० इंजिनीअरिंग महाविद्यालये बंद झाली आहेत. यामध्ये राज्यातील १२९ महाविद्यालयांचा समावेश आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सहा हजार ४७४ महाविद्यालयांची नोंद होती. ती संख्या २०२१-२२मध्ये पाच हजार ९१७ इतकी झाली आहे. म्हणजे, ५५७ कॉलेजे बंद झाली आहेत. २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरात मोठ्या प्रमाणावर इंजिनीअरिंगच्या संस्था सुरू झाल्या होत्या. परिणामी देशातील महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या १० लाखांच्या वर पोहोचली होती. यानंतर महाविद्यालये बंद होण्याचे प्रस्ताव परिषदेकडे सादर होण्यास सुरुवात झाली. परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर कॉलेजे बंद झाली. यामुळे उपलब्ध जागांची संख्याही कमालीची कमी झाली. २०१६-१७मध्ये इंजिनीअरिंगसाठी २९.९९ लाख जागा उपलब्ध होत्या. ती संख्या २०२१-२२मध्ये २३.६१ लाख इतकी झाली आहे. म्हणजे सुमारे सहा लाख जागा कमी झाल्या आहेत. नवीन महाविद्यालयांच्या तुलनेत जुन्या कॉलेजांना मिळणारी पसंती आणि नवीन महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अनेक संस्थांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञ सांगतात. मधल्या काळात मागणीपेक्षा जास्त प्रमाणात महाविद्यालये सुरू करण्यास मुभा दिल्याने वाढलेल्या जागांचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. हे आव्हान पेलणे कोणालाच शक्य नसल्याने अखेर शिक्षण संस्थांनी कॉलेजे बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी जागा कमी झाल्या यामुळे रिक्त जागांचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात २०१६-१७मध्ये ७९५ इंजिनीअरिंग कॉलेजे होती ती २०२१-२२मध्ये ६६६ इतकी आहेत. शैक्षणिक संस्थांचा आलेख वर्ष देशभरातील संस्था राज्यातील संस्था २०१६-१७ ६४७४ ७९५ २०१७-१८ ६४४५ ७७७ २०१८-१९ ६२७५ ७३३ २०१९-२० ६१६४ ७१० २०२०-२१ ६०५३ ६८८ २०२१-२२ ५९१७ ६६६


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YfBLWL
via nmkadda

0 Response to "इंजिनीअरिंगची ५५७ महाविद्यालये बंद; वाढत्या रिक्त जागांचा परिणाम Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel