वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये २११ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु Rojgar News

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये २११ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु Rojgar News

WCL Mining Sirdar and : केंद्र सरकारच्या नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीमध्ये एकूण २११ रिक्त पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. ही भरती कोल इंडियाची सहाय्यक कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये केली जाणार आहे. WCL ची अधिकृत वेबसाईट westerncoal.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे पदांचा तपशील मायनिंग सरदार - १६७ पदे सर्वेक्षक - ४४ पदे एकूण पदांची संख्या – २११ पगार किती असेल? माइनिंग सरदार – रु. ३१,८५२ प्रति महिना सर्वेअर – रुपये ३४,३९१ प्रति महिना हे फक्त मूलभूत वेतन आहे. उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर सर्व भत्त्यांसह पूर्ण पगार मिळेल( ही एकूण रक्कम याच्या जवळपास दुप्पट असेल) डब्ल्यूसीएल मायनिंग सरदार आणि सर्वेअर पात्रता: मायनिंग सरदार साठी- खाणकाम किंवा खाण सर्वेक्षणमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. डीजीएमएसने जाहीर केलेले ओव्हरमॅन सक्षमता प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्रासह तसेच डीजीएमएसने जाहीर केलेले वैध मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्वेअर – दहावीनंतर सर्वेअर प्रमाणपत्र (DGMS द्वारे जाहीर केलेले). किंवा DGMS द्वारे जाहीर केलेले खाण किंवा खाण सर्वेक्षण किंवा सर्वेअर सक्षमता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक भरती २०२१ साठी उमेदवाराचे वय किमान १८ आणि कमाल ३० वर्षे असावे. आरक्षित श्रेणींना सरकारी नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल. असा करा अर्ज या कोल इंडिया भरती २०२१ साठी इच्छुक उमेदवारांना WCL ची अधिकृत वेबसाइट westcoal.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल. २१ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30JOMZu
via nmkadda

0 Response to "वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये २११ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel