सीईटी निकाल कधी? इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीचे प्रवेश खोळंबल्याने विद्यार्थी चिंतेत Rojgar News

सीईटी निकाल कधी? इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीचे प्रवेश खोळंबल्याने विद्यार्थी चिंतेत Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी-सीईटीचा (MHT-CET Result) निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे या आधारे होणारे प्रवेश खोळंबले आहेत. प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा निकाल १५ ऑक्टोबरच्या आसपास जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. राज्यातून पाच लाख पाच हजार ७८८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएम ग्रुपसाठी दोन लाख २८ हजार ४८६; तर पीसीबी ग्रुपसाठी दोन लाख ७७ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. ग्रुपनुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी परीक्षेसाठी वेळ देण्यात आली होती. १५ ऑक्टोबरला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, अशी संभाव्य तारीख प्रवेश परीक्षा कक्षाने दिली होती. मात्र, अद्याप निकाल जाहीर झाला नाही. यामुळे प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार नवीन प्रवेशाची पहिली फेरी २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप निकालच जाहीर न झाल्याने प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होणार याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज? प्रवेश परीक्षेदरम्यान राज्यात काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या भागातील विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नव्हते. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नंतर घेण्यात आली. या सर्व प्रकारामुळेही प्रक्रियेला उशीर झाल्याचे सूत्रांकडून समजते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेशासाठीची ही मुदत जाहीर करण्यात आली होती. यामुळे विविध राज्यांच्या मागणीनुसार परिषदेने सर्वोच्च न्यायालयात मुदत वाढवून देण्याबाबत विनंती अर्ज केल्याचे सूत्रांकडून समजते. हा अर्ज मंजूर झाला तर राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. दरम्यान, पुढील आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची प्रक्रिया सुरू असून, लवकरात लवकर निकाल जाहीर केला जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आर. एस. जगताप यांनी सांगितले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B78IC9
via nmkadda

0 Response to "सीईटी निकाल कधी? इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीचे प्रवेश खोळंबल्याने विद्यार्थी चिंतेत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel