दीड वर्षाच्या मधल्या सुट्टीनंतर... ! Rojgar News

दीड वर्षाच्या मधल्या सुट्टीनंतर... ! Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सकाळी लवकर उठायचे... शुचिर्भूत होऊन गणवेश घालून शाळेत जायचे.... ही वेळ तब्बल दीड वर्षांनी पुन्हा आली आहे. गेल्या दीड वर्षांचा आराम आणि आळस यांच्याशी लढण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या सूचना शाळांनी पालकांना केल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष वर्गांसाठी शाळा, शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थी सज्ज झाले आहेत. यासाठी शाळांनी सर्व पालकांना पीडीएफ स्वरूपातील सूचना-पुस्तिकाही पाठवल्या आहेत. तब्बल दीड वर्षांच्या विरामानंतर आजपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या तयार करावे, अशी सूचना शाळांनी पालकांना केली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय लावावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. करोनाकाळातील सक्तीच्या सुट्यांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांच्या रात्री झोपण्याचे आणि सकाळी उठण्याचे वेळापत्रकच बदलले असल्याचे विविध अभ्यासांतून दिसून आले आहे. यामुळे शाळांनी या प्रमुख सूचना पालकांना केल्याचे एका मुख्याध्यापकांनी सांगितले. वर्गांचे विभाजन शाळांमध्ये बाहेरील आवारात प्रत्येक तुकडीनुसार सुरक्षित अंतर ठेवून वर्तुळ आखण्यात आले आहेत. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी तेथे उभे राहून सॅनिटायझरचा वापर करून वर्गात प्रवेश करावा, असे नियोजन करण्यात आले आहे. वर्गात बाकांवरही हजेरी क्रमांक घालून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तुकडीत आणखी एक उप तुकडी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी विभाजन झाले आहे. जे विद्यार्थी वर्गात नसतील, त्यांच्यासाठी वर्गातून थेट ऑनलाइन शिक्षणाची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालकांचे सहकार्य हे सर्व नियोजन करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी सज्ज आहेतच, मात्र तरीही पालकांनी स्वच्छेने यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन शाळांनी केले आहे. याला काही पालकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून तापमान मोजण्यापासून रांगा लावण्यापर्यंतच्या काही जबाबदाऱ्या पालकांवर सोपवण्यात आल्या आहेत. काही डॉक्टर पालकांनी शाळेत काही वेळ सेवा देण्याची इच्छाही दर्शविली आहे. यामुळे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळा शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. आजारी असल्यास सुट्टी पाल्याला अशक्तपणा, सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य कोणताही आजार असेल, तर शाळेत पाठवू नये, सर्वांच्या सुरक्षेसाठी अशा विद्यार्थ्याने शाळेत येऊ नये, अशी सूचनाही या पुस्तिकेतून करण्यात आली आहे. शाळांच्या सूचना - विद्यार्थ्यांना 'मधली सुट्टी' मिळणार नाही. त्यामुळे शाळेत येण्यापूर्वी मुलांना भरपेट न्याहारी द्यावी. - विद्यार्थी, पालकांनी घरातून थेट शाळेत आणि शाळेतून थेट घरी जावे. - वाटेत अन्य दुकांनात अथवा मित्रांकडे जाऊ नये. - विद्यार्थ्यांसोबत सॅनिटायझर, अतिरिक्त मास्क, पाण्याची बाटली पाठवावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3a6uVoJ
via nmkadda

0 Response to "दीड वर्षाच्या मधल्या सुट्टीनंतर... ! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel