विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या सूचनेनंतर रेल्वेचा निर्णय Rojgar News

विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या सूचनेनंतर रेल्वेचा निर्णय Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, मुंबई केवळ मासिक पासच्या आधारे १८ वर्षांखालील मुलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शाळा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारवर शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन मुलांच्या लोकल प्रवासासाठी दबाव वाढत होता. यामुळे राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या. आता रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर ओळखपत्र दाखवून मासिक पास उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने काढलेल्या आदेशात, 'राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या (लसधारक) व्याख्येत काही घटकांचा तातडीने समावेश करण्याच्या सूचना केल्या आहेत. १८ वर्षांखालील व्यक्तींला लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, या वर्गासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या ६० दिवसांपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे', असे स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी लस घेणे शक्य नसल्यास किंवा वैद्यकीय कारणांमुळे लस घेतली नसल्यास अशांना डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर मासिक पास घेऊन लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. तिकीट म्हणजे मासिक पास मध्य रेल्वेने गुरुवारी रात्री उशिरा घेतलेल्या निर्णयाचे पत्र शुक्रवारी व्हायरल झाले. या पत्रात 'तिकीट' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी दुपारी व्हायरल पत्र ट्विट करत 'तिकीट' म्हणजे 'मासिक पास' वाचावे, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YViERD
via nmkadda

0 Response to "विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या सूचनेनंतर रेल्वेचा निर्णय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel