केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईला माजी विद्यार्थ्यांकडून मिळणार इमारतीची नवीन विंग Rojgar News

केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईला माजी विद्यार्थ्यांकडून मिळणार इमारतीची नवीन विंग Rojgar News

IIT Powai: आयआयटी पवईला लवकरच त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून इमारतीची नवीन विंग मिळणार आहे. ही नवीन विंग अंदाजे ४० हजार चौरस फूट असणार आहे. केंद्रीय विद्यालय, , आयआयटी बॉम्बे, श्रीमती दुर्गा देवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शर्मा फाउंडेशनने केंद्रीय विद्यालय आयआयटीची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. शर्मा फाउंडेशनचे विश्वस्त नरोत्तम शर्मा आणि श्रीमती दुर्गा देवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत शर्मा हे दोघेही केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईचे माजी विद्यार्थी आहेत. दोघांनीही हे दान त्यांचे दिवंगत आजोबा पंडित चंद्रभान भुरामल शर्मा यांना समर्पित केले आहे. या भागीदारीबद्दल आपले विचार व्यक्त करताना प्रशांत शर्मा, जे नरेडको महाराष्ट्राचे सचिव देखील आहेत, म्हणाले, 'आमचा या शाळेशी भावनिक संबंध आहे आणि शाळेला काही ना काही मार्गाने मदत करणे हा आमच्यासाठी एक सन्मान आहे. या नवीन विंगच्या बांधकामामुळे केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. तरुण प्रतिभा आणि भविष्यातील नेत्यांचे संगोपन करण्यासाठी आमची ही शाळा नेहमीच ओळखली जाते. इतर नरेडको सदस्यांच्या पाठिंब्याने, आम्ही या शहराच्या विकासामध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणण्यासाठी प्रत्येक शक्य मार्गाने योगदान देत राहू.' अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईच्या प्राचार्या ममता भट्टाचार्य या ही यावेळी उपस्थित होत्या. केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी श्रीमती दुर्गा देवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शर्मा फाउंडेशनच्या उदार योगदानामुळे, शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवून आपल्या मिशनकडे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mOiaoO
via nmkadda

0 Response to "केंद्रीय विद्यालय आयआयटी पवईला माजी विद्यार्थ्यांकडून मिळणार इमारतीची नवीन विंग Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel