अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांची भरती Rojgar News

अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांची भरती Rojgar News

Teaching Job: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. थेट मुलाखतीतून उमेदवाराची निवड होणार आहे. महाराष्ट्र पब्लीक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६ सेक्शन १०३ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. विशिष्ट कालावधीसाठी ही भरती असणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये ही भरती होणार आहे. दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी एम.सी. हॉल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर या पत्त्यावर यायचे आहे. मुलाखतीना येताना शैक्षणिक, अनुभव दर्शविणारी महत्वाची कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील पदभरतीचे नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. कागदपत्रांमध्ये काही गोंधळ आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि नियमानुसार कारवाई होऊ शकते. सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरती पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी रिक्त जागा, पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात तंत्रज्ञान विभागाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यात येणार आहेत. संशोधन सल्लागार (Reaserch Advisor), तंत्रज्ञान सल्लागार (Technical Advisor), प्रकल्प सहाय्यक (Project Assistant), कार्यालय सहाय्यक (Office Helper), कारकून (Peon) पदांवर प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. ५ जागांपैकी कोणतीही जागा आरक्षित नाही. पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे. पदाची गरज ओळखून भविष्यात वाढवला जाऊ शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११००७ या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहणे गरजेचे आहे. उमेदवारांनी येताना रेझ्युमेसोबत शैक्षणिक आणि भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Wt2bTZ
via nmkadda

0 Response to "अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel