Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-19T12:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कॉलेजांची लगबग! लशीच्या दोन मात्रांच्या अटीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मर्यादा Rojgar News

Advertisement
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा आणि ज्युनिअर कॉलेजे सुरू झाली असतानाच, २० ऑक्टोबरपासून राज्यभरातील कॉलेजांची दारेही उघडणार आहेत. नवी मुंबईतील विविध कॉलेजांनी त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांनाच प्रत्यक्ष वर्गात बसण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना विद्यापीठाने कॉलेजांना केली आहे. मात्र कॉलेजांनी सर्वेक्षण केले असता, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांनीच दुसरी मात्रा घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मर्यादा येणार आहे. असे असले तरीही कॉलेजांनी वर्गांची स्वच्छता, निर्जंतुकीकरणाच्या कामांना वेगाने सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आठवी ते बारावीचे ऑनलाइनसह ऑफलाइन वर्ग सुरू झाले आहेत. या मुलांच्या शिक्षणाची घडी बसत असतानाच आता २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने आणि मुंबई विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे इतके दिवस बंद असलेल्या कॉलेजांत सध्या साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, जंतुनाशक फवारणीची कामे सुरू आहेत. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी, शारीरिक तापमान, तोंडावर मास्क आदींची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. या प्राथमिक उपाययोजनांसह लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळणार आहे. या अनुषंगाने पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम कॉलेजांकडून सुरू होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे सर्वेक्षण केले असता, सरासरी केवळ २० टक्केच विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन मात्रा घेतल्याचे समोर आले आहे. ५० टक्के विद्यार्थ्यांनी पहिली मात्रा घेतली असून ३० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप पहिली मात्राही घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉलेज सुरू झाले तरी विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती केवळ २० टक्केच असणार आहे. त्यामुळे अनेक कॉलेजांनी विद्यार्थ्यांना लशीच्या मात्रा घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कॉलेजात पहिले तीन तास वर्ग भरणार आहेत. एका विषयाचा एक तास या प्रमाणे हे नियोजन आहे. 'ऑफलाइन'सह ऑनलाइनही मुलांना शिकवले जाणार आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कँटीन बंदच राहणार आहेत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ही अट का? आठवी ते दहावीमधील १८ वर्षांखालील मुलांच्या ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांचे लसीकरणही सुरू करण्यात आलेले नाही. मात्र त्यांच्या शाळा लसीकरणाशिवाय सुरू आहेत आणि १८ वर्षांवरील मुलांच्या वर्गात जाण्यासाठी मात्र दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अट घालण्यात आली आहे. ही विसंगती असल्याची तक्रार एका पालकाने केली आहे. शिक्षण विभाग आणि विद्यापीठ यांच्याकडून आलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही कॉलेज उघडण्याची तयारी सुरू केली आहे. नियमांचे पालन करूनच कॉलेजमधील वर्ग भरणार आहेत. आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. - डॉ. शुभदा नायक, प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन वर्ग सुरू केले जाणार आहेत. लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, इतर विद्यार्थ्यांचेही लसीकरण होईल, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. - प्राचार्य प्रताप महाडिक, रा. फ. नाईक कॉलेज, कोपरखैरणे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30FqbFk
via nmkadda