Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T04:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आजपासून कॉलेजमध्ये 'कल्ला'; दीड वर्षांनी कॅम्पस फुलले Rojgar News

Advertisement
करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये २३ मार्च २०२० पासून बंद झालेली महाविद्यालये तब्बल दीड वर्षानांतर म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज, बुधवारी (दि. २०) पुन्हा बहरत आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोव्हिड प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आले. करोना तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ही ऑनलाइन होते ती काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून करोना संसर्ग आटोक्यात असल्यामुळे, तसेच १८ वर्षांवरील लसीकरणाचे प्रमाणही गेल्या काही महिन्यांत वाढल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी सूचना जारी करून सुरक्षेसंदर्भात निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मॉडेल डिग्री कॉलेज तसेच स्वायत्त महाविद्यालये सुरू होतील. महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी संपूर्ण इमारत सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. एका तुकडीसाठी विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के मर्यादा निश्चित करण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्यवस्था राहील. - १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सोय - दोन लशी घेतलेल्यांना महाविद्यालयात प्रवेश - एका बाकावर केवळ एकाच विद्यार्थ्याला बसविणार - प्रत्येकाला मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार वसतिगृहात एका खोलीत एकच विद्यार्थी अध्यापनाचा वेळ ४५ मिनिटांचा राहणार आहे. तरीही महाविद्यालय सुरू ठेवण्याची वेळ त्यांच्या स्तरावर निश्चित करण्याचे आदेशात म्हटले आहे. क्रीडाविषयक परवानगी दिली जाणार नाही. वसतिगृहामध्ये एका खोलीत एक विद्यार्थी, विद्यार्थिनीची व्यवस्था राहील. वसतिगृहाची खोली मोठी असल्यास दोघांना परवानगी असणार आहे. वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZaVXtl
via nmkadda