Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-05T07:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

भारतीय स्टेट बॅंकेत २०५६ पदांची भरती; अर्ज प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

Advertisement
SBI PO : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या त्याच्या विविध शाखांमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. SBI PO २०२१ नोटिफिकेशननुसार (क्र. CRPD/PO/2021-22/18) एकूण २०५६ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात. २५ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. SBI PO Notification 2021: असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरील करिअर सेक्शनमध्ये जा. या विभागात दिलेल्या SBI PO 2021 नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा.अर्जाचे पेज खुले होईल. उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा आणि अर्ज सबमिट करा. एसबीआय पीओ २०२१ अर्जासोबत उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एसबीआयने जाहीर केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भरती नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ६०० हून अधिक पदांची भरती भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमदेवारांसाठी खुशखबर आहे. देशातली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस यूनिट मध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसह एकूण तीन भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या माध्यमातून एकूण ६०६ पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर दिलेली लिंक किंवा पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया मंगळवार २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत आहे. यात रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) आणि सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) या पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्जांसह ७५० रुपये शुल्कदेखील भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेने स्पेशलिस्ट केडर ऑफिसरअंतर्गत मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) च्या एकूण ३८ पदांवर नियमित आधारावर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवार बँकेच्या वेबसाइटवर भरती सेक्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ixoRdQ
via nmkadda