'पीडीसीसी'तील नोकर भरतीला स्थगिती Rojgar News

'पीडीसीसी'तील नोकर भरतीला स्थगिती Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये () ३५६ जागांसाठी सुरू असलेल्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात आली आहे. या बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला करोनामुळे मुदतवाढ मिळाली असली, तरी नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे बँकेने नोकरभरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून, लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. दरम्यानच्या काळात बँकेने ३५६ लिपिक पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, आता नोकरभरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, लिपिक पदाच्या ३५६ जागांसाठी ३७ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यावर भरती प्रक्रिया केली जाणार आहे. या पदासाठी १०० गुणांची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये ९० गुण हे लेखी परीक्षेसाठी, पाच गुण उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि पाच गुण मुलाखतींसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे र्बंकेकडून स्पष्ट करण्यात आले. सभासदांना आठ टक्के लाभांश बँकेच्या सभासदांना आठ टक्के दराने लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बँकेच्या १०४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दतात्रय भरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, अर्चना घारे आदी सहभागी झाले होते. बँकेच्या मार्च २०२१अखेर एकूण ठेवी सुमारे ११ हजार ३२९ कोटी आणि कर्जे सुमारे आठ हजार १०९ कोटी २५ लाख रुपये आहेत. बँकेचा ढोबळ नफा सुमारे २८२ कोटी ५१ लाख रुपये, तर निव्वळ नफा सुमारे ५५ कोटी १० लाख रुपये झाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iBquqT
via nmkadda

0 Response to "'पीडीसीसी'तील नोकर भरतीला स्थगिती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel