सीए डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

सीए डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

December 2021: ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ () तर्फे आधी जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी उमेदवारांना ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. पण काही कारणामुळे अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांसाठी संस्थेने अॅप्लीकेशन विंडो २ दिवस खुली ठेवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच उमेदवार आता परीक्षेसाठी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करू शकतात. सीए डिसेंबर २०२१ परीक्षा नोंदणी विंडो २ दिवसांसाठी पुन्हा उघडण्याबाबत आयसीएआयने नोटीस जाहीर केली आहे. यानुसार या दोन दिवसांच्या कालावधीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये विलंब शुल्कही भरावे लागेल. परीक्षेसाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्त हे शुल्क परीक्षेसाठी आकारले जाईल. ऑनलाईन नोंदणी दरम्यान विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आणि विलंब शुल्क भरू शकतील. दुसरीकडे, करोना काळामध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही असे आयसीएआयने जाहीर केले आहे. एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ दरम्यान केलेल्या नोंदणीवर ही सवलत लागू होणार आहे. आयसीएआय द्वारे सीए डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अॅप्लिकेश विंडो पुन्हा उघडण्यासंदर्भात गुरुवारी नोटीस जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, करोनाची स्थिति ध्यानात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार्टर्ड अकाउंटन्ट्स अंतिम, इंटरमिडिएट, फाउंडेशन, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सेसच्या डिसेंबर २०२१ साठी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. चार्टर्ड अकाउंटंट डिसेंबर परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरू होतील आणि २० डिसेंबर २०२१ पर्यंत संपतील. अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mHmlTp
via nmkadda

0 Response to "सीए डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel