सीएस प्रोफेशनल जून परीक्षांचे निकाल जाहीर, 'या' थेट लिंकवरुन तपासा Rojgar News

सीएस प्रोफेशनल जून परीक्षांचे निकाल जाहीर, 'या' थेट लिंकवरुन तपासा Rojgar News

ICSI CS : सीएस जून २०२१ सत्राच्या () कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह ( Exicutive) आणि फाउंडेशन कोर्स परीक्षांमध्ये (Foundation Course Exam) उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या सीएस निकाल २०२१ (CS Result 2021) ची प्रतीक्षा संपली आहे. ICSI ने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल नियोजित वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केले आहेत. परीक्षेत बसलेले उमेदवार निकाल पोर्टल अधिकृत वेबसाइट icsi.examresults.net वर दिलेल्या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात. उमेदवारांना बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून निकाल तपासता येईल. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) तर्फे तिन्ही अभ्यासक्रमांच्या जून सत्र परीक्षांचे निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. संस्थेने अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाहीर केलेल्या अपडेटनुसार, आयसीएसआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार तिन्ही अभ्यासक्रमांच्या निकालाची वेळ वेगळी ठेवण्यात आली आहे. निकाल २०२१ सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. तर जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासाठी सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल २०२१ दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यानंतर सीएस फाउंडेशन निकाल २०२१ दुपारी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे. ICSI CS Result 2021 : असा तपासा निकाल आणि स्कोअर कार्ड उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांनी वेबसाइटवरील एक्झाम सेक्शनमध्ये जावे. तिथे निकाल तपासण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल. येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल. रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. उमेदवार अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकालांविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळवू शकतात. सध्याच्या करोना परिस्थितीमुळे जून २०२१ सत्राची परीक्षा ICSI ने पुढे ढकलली होती. फाऊंडेशनची परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट तसेच ११ आणि १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. व्यावसायिक आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा १० ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान घेण्यात आली. निकालाची हार्ड कॉपी नंतर प्रसिद्ध होणार प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह आणि फाउंडेशन कोर्सेससाठी ICSI CS निकाल २०२१ ची ऑनलाइन घोषणा करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांच्या निकालाची हार्ड कॉपी आणि मार्कशीट नंतर ICSI द्वारे जाहीर केली जाणार आहे. संस्थेने दिलेल्या अपडेटनुसार कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थीनींना निकाल घोषित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत हार्ड-कॉपी मिळाली नसेल तर त्यांनी कॉल किंवा ईमेल करून संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DvSi7U
via nmkadda

0 Response to "सीएस प्रोफेशनल जून परीक्षांचे निकाल जाहीर, 'या' थेट लिंकवरुन तपासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel