TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

एमफील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करा; विद्यापीठात विविध मागण्यांसाठी आंदोलन Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद एम फीलची प्रवेश प्रक्रिया सुरू करा, कमवा आणि शिका योजना सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय इमारतीसमोर संघटनेने निदर्शने केले. त्यानंतर कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. निवेदनात विद्यापीठातील वसतिगृह सुरू करण्यात यावेत, पदवी, पदव्युत्तरच्या तांत्रिक अडचणीमुळे राहिलेले पेपर परत घेण्यात यावे व त्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा. करोनाच्या काळात काही विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता आले नाही. त्यांचे परीक्षा फॉर्म भरून परीक्षा घेण्यात याव्यात. दुसरे, चौथे आणि सहावे सत्रमध्ये खूप विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यांची फेर तपासणी करून पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर महासचिव प्रा. प्रकाश इंगळे, अॅड. नागसेन वानखेडे, अनिल दिपके, अविनाश सावंत, संकेत कांबळे, रामेश्वर कबाडे पाटील, रोहित जोगदंड, भिमराव वाघमारे, अमोल घुगे, अक्षय देहाडे, जयश्री शिर्के, ऋषी कांबळे, भागवत चोपडे, गजानन गवई आदींचे नावे आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3msLhxJ
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या