Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-14T08:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्टाफ सिलेक्शनतर्फे ९ व्या टप्प्यातील भरतीसाठी महत्वाचे नोटिफिकेशन Rojgar News

Advertisement
Selection Posts : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) नवव्या टप्प्यातील भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्यानुसार पोस्ट फेज ९ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली जाणार नाही. त्यामुळे या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. गेल्या दिवसांमध्ये वेबसाइटवरील ट्रॅफिक वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा असे आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. SSC Recruitment 2021: रिक्त पदांचा तपशील स्टाफ सिलेक्शनद्वारे आयोजित या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३२६१ पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफची ४०० हून अधिक पदे,रिसर्च असिस्टंटची १४६ पदे आणि ज्युनिअर ज्योग्राफिकल असिस्टंटची ६२ पदांचा समावेश आहे. यामध्ये एससीसाठी ४७७, एसटीसाठी २४९, ओबीसीसाठी ७८८, अनारक्षित १३६६ आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ३८१ पदे आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित परीक्षेद्वारे केली जाईल. जे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोजित केली जाईल. SSC Recruitment 2021: शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही भरतीशी संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. DRDO मध्ये विविध पदांची भरती डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO)ने गेट आणि नेट परीक्षा क्वालिफाय करणाऱ्या तरुणांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार DRDO ची अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर ऑनलाइन नोटिफिकेशन वाचू शकतात आणि नंतर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेनंतर ३० दिवसांची आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून फॉर्म डाऊनलोड करावा आणि भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह निदेशक, रक्षा खाद्य अनुसंधान प्रयोगशाला, सिद्धार्थ नगर, म्हैसूर- ५७००११ या पत्त्यावर स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डिफेंस फूड रिसर्च लॅबोरेटरी (Defence Food Research Laboratory) म्हैसूर मध्ये लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी बोलावले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सूचना ई-मेल आणि स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवल्या जातील. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aCaaSg
via nmkadda