Advertisement

IGCAR :भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात(IGCAR) ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठी अर्ज केलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. IGCAR ने ग्रुप ए आणि बीच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला अर्ज केलेले उमेदवार आपले प्रवेशपत्र IGCAR च्या अधिकृत वेबसाइटवर igcar.gov.in वर जाऊन डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. केंद्राने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेण्यात येईल. प्रत्येक नियोजित तारखेला ही परीक्षा दोन बॅचमध्ये घेतली जाणार आहे. या बॅचेस २-२ तासांच्या असतील. बॅच सकाळी १० आणि दुपारी २ वाजता सुरू होतील. IGCAR मध्ये ग्रुप ए आणि बीच्या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या पोस्ट आणि ट्रेडसाठी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेची तारीख आणि बॅचची माहिती खाली दिलेल्या थेट लिंकवरून तपासू शकतात. १२० मिनिटांत ७५ प्रश्न सोडवा IGCAR ने जाहीर केलेल्या नोटीफिकेशननुसार, ऑनलाइन परीक्षा १२० मिनिटांची असेल. त्यात बहुपर्यायी स्वरूपाचे ७५ प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न रिक्त पदांशी संबंधित विषयातून असतील. प्रत्येक प्रश्नासाठी ३ गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कापला जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. स्टाफ सिलेक्शनतर्फे परीक्षेच्या तारखा जाहीर स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कम्बाइंड हायर सेकेंडरी लेव्हल एक्झाम(CHSL) टियर २ आणि कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल(CGL) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षांसाठी अर्ज केले आहेत (SSC CHSL, CGL Paper 2 Exam Date) ते SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात. कर्मचारी निवड आयोगाकडून यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, टियर २ परीक्षा २८ आणि २९ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. तर संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरील परीक्षेची (CHSL) टायर २ परीक्षा ९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचा संपूर्ण तपशील अधिकृत वेबसाइट- ssc.nic.in वर मिळू शकेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oNNF5f
via nmkadda