राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु, 'अशी' घेतली जाणार काळजी Rojgar News

राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु, 'अशी' घेतली जाणार काळजी Rojgar News

Reopening 2021: शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर राज्यभरातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. विविध जिल्ह्यांमधील शाळांनी यासंदर्भात तयारी केली असून प्रत्यक्ष विद्यार्थी येण्याची वाट पाहिली जात आहे. करोनाच्या मोठ्या काळानंतर पुन्हा मित्रपरिवार वर्गांमध्ये भेटणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील याबाबत उत्सुकता आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार शाळांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी शाळेत येण्यापुर्वी शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल याची काळजी शाळांकडून घेण्यात आली आहे. एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, मैदानी खेळ किंवा तत्सम कारणांनी विद्यार्थी एकमेकांच्या जवळच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी देखील घेतली जाणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकणार आहेत. त्यामुळे पालकांची संमती आणि सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे. मुलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्व एकत्रित येऊन ही जबाबदारी पार पाडू असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन वेबिनारमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. शाळांसाठी महत्वाचे निर्देश शाळा सुरु होताना टास्क फोर्सने दिलेल्या सुचनांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शाळेने शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरु करावे. नियमितपण विद्यार्थ्यांचे तापमान तपासावे अशी सूचना करण्यात आली आहे. मुलांनी शाळेत पायी येण्यास शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूलबस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. तसेच सद्यस्थितीत मैदानी खेळ घेऊ नयेत अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. सरसकट शाळा सुरु करण्याची मागणी शहरी भागात केवळ आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, असे वर्गीकरण न करता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून केली जात आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळा सुरू नसल्याने मोठे नुकसान होत असून, या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका आता शिक्षण क्षेत्रातून मांडण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B7ighb
via nmkadda

0 Response to "राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु, 'अशी' घेतली जाणार काळजी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel