Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-26T07:43:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीसाठी संधी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुरू झालेली प्रक्रिया, पहिले सत्र संपत आले तरी तीन महिन्यांपासून सुरूच आहे. सुमारे १५ दिवस प्रथम येणाऱ्यास प्रधान्य तत्वावर प्रवेश प्रक्रिया राबवूनही या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यादरम्यान पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश रक्रिया राबविली जात आहे. २६ जुलैला ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. त्यानंतर एक ते सात ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना डमी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरून, नोंदणी प्रक्रियाही सुरू केली होती. त्यानंतर १४ ऑगस्टला पहिल्या प्रवेश फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी व सात टप्प्यांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वाने अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. २६ जुलै ते २६ ऑक्टोबर या काळात जवळपास तीन महिने प्रवेश प्रक्रिया राबवूनही आता पुन्हा ३१ ऑक्टोबरपर्यंत अकरावी प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच अद्याप प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत प्रवेश घेता येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वाने राबविली जाणार आहे. नियमित फेऱ्यांदरम्यान अकरावीमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अध्यापनही सुरू झालेले असताना, केवळ जागा भरण्यासाठी पहिले सत्र संपत आले तरी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. ............तरी जागा रिक्तच तीन महिने प्रवेश प्रक्रिया राबवूनही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सहा हजारांवर जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. चार ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेरीलाही पहिला टप्पा वगळता फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. वीस दिवसांमध्ये केवळ पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अद्याप सहा हजार ३०६ जागा शिल्लक आहेत. अकरावी प्रवेशाचा लेखाजोखा एकूण जागा................२५३८० प्रवेशित विद्यार्थी...........१९०७४ रिक्त जागा.................६३०६


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CjH2eS
via nmkadda