Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-04T03:43:02Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज, 'इतक्या' शिक्षकांचे लसीकरण पूर्ण Rojgar News

Advertisement
Reopening 2021: पुणे महापालिकेने शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्रसिद्ध केल्यानंतर, शहरातील शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी-पालकांशी संवाद साधत त्यांना शाळेत येण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शहरातील बहुतांश शाळांचे सॅनिटायझेशन पूर्ण झाले आहे. शाळांमध्ये मुबलक प्रमाणात सॅनिटायझर, साबण आणि पाण्याची सुविधा निर्माण केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज असून, आता विद्यार्थ्यांची वाट शिक्षक पाहत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सरकारी शाळांची स्वच्छता करण्यापासून ते इतर सोयी सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून, जिल्ह्यातील सरकारी, खासगी शाळांमधील सुमारे २० हजार शिक्षकांनी लशीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये ९४ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विद्यार्थी आरोग्याच्या सुरक्षेसाठी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र शाळांना संलग्न करण्यात आल्याची माहिती नाशिकच्या शिक्षण विभागाने दिली. राज्य सरकारने २४ सप्टेंबरला शाळा सुरू करण्याबाबच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांसह पुणे महापालिकेच्या सूचनांचे पालन करूनच, पुणे शहरातील शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, पालकांच्या समुहासोबत ऑनलाइन पद्धतीने बैठक घेऊन सूचनांची माहिती दिली. अनेक शाळांनी पालकांकडून संमती पत्र जमा केले आहेत. पालकांनीदेखील मोठ्या संख्येने पुढे येऊन शाळा सुरू करण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होण्याला कोणतीही अडचण नसल्याचे शक्षक-मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शहरातील अनेक शाळांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली असून, त्यामध्ये साबण आणि पाणी २४ तास उपलब्ध राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. वर्गखोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एका बाकावर एक जण बसेल, याची काळजी घेण्यात येईल. वर्गात अधिकाधिक हवा खेळती राहील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षित वातावरणात शाळा सुरू होईल, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा सोमवारी (चार ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळेच्या सर्व वर्ग खोल्या, शौचालय, परिसर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून खर्च करून स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी शाळांनी त्यांच्या व्यवस्थापनाच्या मदतीने स्वच्छता करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी दिल्या आहेत. शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी वेग घेण्यात आला असून जिल्ह्यात २५ हजार ५७९ शिक्षक आहेत. त्यापैकी १९ हजार ५२८ एवढ्या शिक्षकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण शिक्षकांपैकी ११५१ शिक्षकांनी अद्याप एकही डोस घेतला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uAlFCZ
via nmkadda