दहावी, बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ Rojgar News

दहावी, बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ Rojgar News

Maharashtra HSC SSC Exm 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता आणि बारावीच्या परीक्षांमध्ये खासगीरित्या नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगीरित्या परीक्षेला बसण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरावा लागतो, या अर्ज प्रक्रियेस नियमित शुल्कासह १३ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया कशी? खासगीरित्या दहावी, बारावी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १३ ते २७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने १७ क्रमांकाचा अर्ज भरायचा आहे. १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज आणि शुल्क जा केल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहेत. संपर्क केंद्रांनी हे अर्ज २ नोव्हेंबर रोजी विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत. शुल्क किती? दहावीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आहे. बारावीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यास कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२०-२५७०५२०७ /२५७०५२०८/ २५७०५२७१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3akjp9u
via nmkadda

0 Response to "दहावी, बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel