Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-16T10:43:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा सोलापुरात! आरोग्य विभाग भरती परीक्षेचा घोळ Rojgar News

Advertisement
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ संपता संपेना अशी म्हणण्याची वेळ आता परीक्षार्थी विद्यार्थ्यावर आली आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार असून सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे. अशावेळी दोन्ही पेपर द्यायचे कसे असा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदावर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वीच परीक्षा घेणार होती घेण्यात येणार होती. पण ऐनवेळी ती पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने ही परीक्षा आता २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याचे हॉल तिकीट अर्ज केलेल्या उमेदवारांना आज मिळाले. हॉल तिकीट पाहून अनेकांचे डोळे चक्रावून गेले. कारण परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना एकेक विद्यार्थ्याने दोन-दोन पदासाठी अर्ज केला आहे हे विसरूनच आरोग्य विभागाने वेळापत्रक तयार केले आहे. २ पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकाच शहरात परीक्षा देता येणे शक्य आहे. तसे नियोजन न करता सकाळी एक पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे अशी अवस्था इतर अनेकांची झाली आहे. एक पेपर पुण्यात तर दुसरा पेपर सांगलीत, एक पेपर साताऱ्यात तर दुसरा पेपर नाशिकला असे नियोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. यामुळे अनेकांना एकाच पदासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने याबाबत नवीन नियोजन करावे अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FQTAwg
via nmkadda