विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी Rojgar News

विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सोमवारी प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे व्हावे या उद्देशाने सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. करोनानिर्बंध शिथिल झाल्यानंतर शाळा सुरू करत असताना राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करताना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, पर्यवेक्षीय यंत्रणा या सर्वांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांची उपलब्धता, डिजिटल साधनांच्या उपलब्धतेनुसार अध्ययन आराखड्याचे नियोजन, स्थलांतरित कामगांराची मुले, विशेष गरजा असणारी मुले, आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता विशेष नियोजन, विद्यार्थी, शिक्षकांचे शारीरिक, मानसिक आरोग्य या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणत्या प्रकारच्या डिजिटल सुविधा आहेत याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर प्रत्येक शाळेने सद्यस्थितीतील शैक्षणिक गरजांची निश्चिती पायाभूत चाचणी करून आशय, मूलभूत कौशल्य आणि अध्ययन निष्पत्तीची सद्यस्थिती या आधारे सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर अध्ययनासाठी नियोजन करताना डिजिटल साधने उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण देण्यात यावे. याचबरोबर ज्यांच्याजवळ साहित्य उपलब्ध नाही त्यांना ऑफलाइन शिक्षण देण्यात यावे, असे सोमवारी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BelCPt
via nmkadda

0 Response to "विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel