Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-05T06:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात भरती, २ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: नाशिक ( Nashik) येथे काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वायसीएमयूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत. त्यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांसाठी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ह्युमॅनिटी सोशल सायन्स, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स/मॅनेजमेंट हे चार विषय शिकविण्यासाठी प्रत्येकी एका प्राध्यापकाची जागा रिक्त आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पीचएचडी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे संबंधित विषयातील किमान दहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसचे सहा रिसर्च प्रसिद्ध असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे पदभरतीत सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांनी पाठवलेल्या अर्जाची छाननी करुन शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल तर मागास प्रवर्गासाठी - २५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. येथे पाठवा अर्ज उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’, गंगापूर धरणाजवळ, गोवरधन, नाशिक – ४२२२२२ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत भरती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहयोगी (Project Associate) आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी ( Senior Project Associate) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3msO7mi
via nmkadda