राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग संशोधन संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News

राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग संशोधन संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News

Recruitment 2021: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute, CSIR – NEERI) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरती अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate), प्रकल्प सहयोगी- I (Project Associate-I), प्रकल्प सहयोगी- II (Project Associate-II), सहाय्यक (Associate) पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate)पदासाठी उमेदवाराकडे जियोमेटीक्स, जियोइन्फॉर्मेटीक्समध्ये एमटेक पदवी असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराची ४० वर्षे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. तसेच या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ४० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांना १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. लॅबोरीटी असिस्टंट पदासाठी सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. यासाठी ५० वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारास २० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे एमएससी केमिस्ट्री असणे गरजेचे आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५ हजार पगार देण्यात येणार आहे. प्रोजेस्ट असोशिएट-II पदासाठी उमेदवाराकडे बॉटनी असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराला २५ हजार पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FEoec6
via nmkadda

0 Response to "राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग संशोधन संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel