Advertisement

Admission: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU)जुलै २०२१ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी पुनर्नोंदणी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे. इग्नूने जुलै सत्रासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुनर्नोंदणी करता येणार होती. पण आतना इग्नूतर्फे नोटिफिकेशन जाहीर करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली. नव्या अपडेटनुसार आता यूजी, पीजी कोर्स (सर्टिफिकेट आणि सेमिस्टर बेस्ड कोर्स व्यतिरिक्त) मधील प्रवेशासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही, त्यांच्यासाठी आता आणखी एक संधी आहे. अशी करा पुनर्नोंदणी इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ सत्रााठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोंदणी करु शकतात. पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. पुनर्नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल. जडेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तसेच BHIM अॅपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल. इग्नूने सर्व विद्यार्थ्यांसाठी पुनर्नोंदणी २५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. शेवटच्या तारखेला विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी २५ ऑक्टोबरची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या प्रवेशाची तारीख वाढली इग्नूने जुलै २०२१ पासून सुरू होणाऱ्या विविध यूजी, पीजी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली. इग्नूमध्ये ओपन डिस्टन्स लर्निंग (ओडीएल) अभ्यासक्रमांसाठी २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. जुलै २०२१ सत्रासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oQT4Zb
via nmkadda