सीबीएसईतर्फे दहावी, बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर Rojgar News

सीबीएसईतर्फे दहावी, बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर Rojgar News

Date Sheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड दहावी आणि बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारासाठी मायनर विषयांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.nic.in पाहता येणार आहे. दहावी टर्म १ मायनर विषयांची परीक्षा १७ नोव्हेंबरला चित्रकलेच्या पेपरपासून सुरूवात होणार आहे. ७ डिसेंबरला अरबी, तिबेट, फ्रेंच, जर्मन, रशियन, पारसी, नेपाळी, लिंबू, लेप्चा आणि कर्नाटक आणि म्युझिकच्या पेपर सह समाप्त होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीची की टर्म १ मायनर विषयांची परीक्षा १६ नोव्हेंबर उद्योग, ब्यूटी आणि वेलनेसच्या पेपरने सुरूवात होऊन ३० डिसेंबर रोजी कृषी आणि मास मीडिया स्टडीजच्या पेपरने समाप्त होईल. दहावी मायनर सब्जेक्टच्या परीक्षा या बारावीच्या मेजर विषयांच्या परीक्षांसोबत आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीसाठी माइनर विषयांची परीक्षाही दहावीच्या मेजर विषयांच्या परीक्षेसोबत होणार आहे. थंडीचे हवामान लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा सकाळी साडेदहा ऐवजी ११.३० वाजता सुरु होणार आहेत. आणि वाचनासाठी १५ ऐवजी २० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. CBSE दहावीचे वेळापत्रक चित्रकला - १७ नोव्हेंबर २०२१ गुरुंग, तमांग, थाई आदि - १८ नोव्हेंबर २०२१ उर्दू, पंजाबी, बंगाली आदि- २० नोव्हेंबर २०२१ संस्कृत - २२ नोव्हेंबर २०२१ CBSE बारावीचे वेळापत्रक इंटरप्रेन्योरशिप- १६ नोव्हेंबर २०२१ टेक्सटाइल डिझाईन- १७ नोव्हेंबर २०२१ मार्केटिंग- १८ नोव्हेंबर २०२१ फॅशन स्टडीज- २२ नोव्हेंबर २०२१ परीक्षा केंद्र बदलण्याची संधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे टर्म १ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आता सीबीएसईकडून आलेल्या नव्य अपडेटनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रात (CBSE Term 1 Centre) बदल करता येऊ शकतो. सीबीएसईच्या नोटिसनुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा असलेल्या ठिकाणी सध्या नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची सुविधा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी केव्हा आपल्या शाळांशी संपर्क साधायचा याचा तपशली सीबीएसईकडून देण्यात आला आहे. असा तयार होणार बोर्ड परीक्षेचा निकाल बोर्ड परीक्षेचा निकाल कसा तयार होईल याबद्दल परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी (NEP)च्या शिफारशींचे पालन करीत आहोत. म्हणून आम्ही २ टर्म मध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टर्म १ हा वस्तुनिष्ठ प्रकार असेल आणि टर्म २ सब्जेक्टिव्ह असेल असे भारद्वाज म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZgPBZl
via nmkadda

0 Response to "सीबीएसईतर्फे दहावी, बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel