सीएस फाउंडेशनचा निकाल जाहीर; जााणून घ्या टॉपर्सची यादी Rojgar News

सीएस फाउंडेशनचा निकाल जाहीर; जााणून घ्या टॉपर्सची यादी Rojgar News

ICSI CS Toppers 2021: ICSI CS प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षांचे निकाल जाही करण्यात आले आहेत. आयसीएसआय सीएस निकाल मार्कशीट लवकरच उमेदवारांच्या पत्त्यावर पाठवली जाईल. अधिकृत नोटीस नुसार निकाल घोषित झाल्याच्या ३ दिवसांच्या आत उमेदवाराकडे निकालाची हार्ड कॉपी पाठवली जाईल. आयसीएसआयने सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह जुना आणि नवीन निकाल २०२१ निकाल जाहीर झाल्यानंतर आता फाउंडेशनच्या निकालांची वाट पाहिली जात आहे. संस्थेतर्फे फाउंडेशन परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे. ताज्या अपडेटनुसार तांत्रिक बिघाडामुळे ICSI निकाल जाहीर होण्यास उशीर होत आहे. निकाल लवकरच जाहीर केला जाईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ICSI ची अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ICSI CS Toppers 2021: आयसीएसआय सीएस न्यू कोर्स टॉपर्स ICSI CS प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यानंतर परीक्षेतील टॉपर यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रोफेशन प्रोग्रामच्या ओल्ड कोर्समध्ये वैष्णवी आणि नवीन कोर्समध्ये ईशान अव्वल आहे. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आयसीएसआय सीएस टॉपर्स २०२१ मध्ये सर्व मुली टॉपर्स आहेत. परीक्षेला बसलेले विद्यार्थी ओल्ड आणि न्यू कोर्समधील टॉपर्सची यादी तपासू शकतात. ICSI CS Toppers 2021: न्यू कोर्स टॉपर वैष्णवी बद्रीनारायण १ मोदिता साहू २ वंदिता ललितभाई टाकी ३ कविशा भटनागर ४ काजल सुरेशभाई काकवानी ४ पार्वती एस ५ निमिता कैलास दधिच ६ दिव्या रामकुमार गुप्ता ७ जिज्ञासा कुमारी ८ निधी अश्विन देधिया ९ साक्षी पोरवाल १० ICSI CS Toppers 2021: ओल्ड कोर्स टॉपर्स ईशान मनोज १ रावली मुलगडा २ दिशा जैन ३ दिव्या भारद्वाज ४ सर्वेश दिवाण ५ गौरी अजय श्रोत्री ६ काजल कुमारी सिंग ७ प्रियंका अग्रवाल ७ Result 2021: असा तपासा निकाल निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा. होमपेजवर एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल एग्झाम रिझल्ट २०२१ ची अॅक्टिव्ह लिंक दिसेल रिझल्ट लिकंवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज खुले होईल येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली होती. म्हणजेच ते घरून किंवा जवळच्या कोणत्याही सुविधा असलेल्या ठिकाणाहून परीक्षा देऊ शकले.परीक्षेच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून चांगला इंटरनेट स्पीड असणारा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FGODGm
via nmkadda

0 Response to "सीएस फाउंडेशनचा निकाल जाहीर; जााणून घ्या टॉपर्सची यादी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel