Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-14T13:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कोणत्या विषयासाठी कोणते कॉलेज बेस्ट, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापुर्वी जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Times University Ranking: सध्या सगळीकडे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु आहे. पण कोणताही विद्यार्थी प्रवेश घेण्यापूर्वी सर्वोत्तम महाविद्यालय किंवा सर्वोत्तम विद्यापीठाच्या शोधात असतो. ज्या विषयाचे शिक्षण आपण घेऊ इच्छितो त्यामध्ये कोणते कॉलेज ( in India) आणि विद्याप (Best University in India)बेस्ट आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ (Times Higher Education World University Ranking 2022)मध्ये चार नवीन विषय जोडले गेले. यामध्ये बिझनेस अॅण्ड इकोनॉमिक्स, एज्युकेशन, लॉ आणि सोशल सायन्स यासह २०२२ साठी विषयनिहाय सर्वोत्तम विद्यापीठ रँकिंग जाहीर करण्यात आले होते. या रॅंकिंगचा उपयोग देशभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. सोशल सायन्ससाठी बेस्ट संस्था या रँकिंगनुसार भारतमध्ये सोशल सायन्सच्या शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे. तर जागतिक स्तरावर जेएनयू ४०१-५०० रँक दरम्यान आहे. सोशल सायन्स भारतामध्ये जेएनयू नंतर, अनुक्रमे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (एएमयू), बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) आणि दिल्ली विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो. व्यवसाय आणि अर्थशास्त्रासाठी सर्वोत्तम विद्यापीठ इकोनॉमिक्समध्ये जामिया मिलिया इस्लामियाला (Jamia Millia Islamia) भारतातील सर्वोत्तम विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. जामियाचा ग्लोबल रॅंक ४०१ ते ५०० दरम्यान आहे. भारतामध्ये या विषयांसाठी जामिया मिलियानंतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU),एमिटी युनिव्हर्सिटी (Amity University) आणि अमृता विश्व विद्यापीठाचा (Amrita Vishwa Vidyapeetha) क्रमांक लागतो. लॉ शिक्षणासाठी जागतिक टॉप ६०० मध्ये भारतातून केवळ दोन विद्यापीठांची नावे टाइम्स रॅंकिंगमध्ये आहेत. यामध्ये सविता युनिव्हर्सिटी आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचा समावेश आहे. जागतिक रँकिंग २०२२ (THE World Ranking 2022) जागतिक टॉप १०० मध्ये एका संस्थेला स्थान मिळाले आहे. कॉम्प्युटर सायन्स कॅटेगरीमध्ये भारतातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) जगात ८१ व्या स्थानी आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BKhkzH
via nmkadda