Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-14T10:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयआयटी कानपूरमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
IIT Kanpur : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूरतर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant), कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) आणि कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक (Junior Technical Superintendent), कनिष्ठ अधीक्षक (Junior Superintendent), सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) आणि इतर पदाच्या एकूण ९५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांसाठी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी संस्थेने भरती जाहिरात (क्र .०१/२०२१) प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आयआयटी कानपूरच्या अधिकृत वेबसाइटiitk.ac.in अर्ज करता येणार आहे. या स्टेप्स फॉलो करुन करा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील भरती सेक्शनवर जा. जाहिरात क्रमांक ०१/२०२१ साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. नंतर युझर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.यानंतर उमेदवार आपला अर्ज सादर सबमिट करु शकतील. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. उमेदवारांना १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना ग्रुप ए पदांसाठी ५०० रुपये आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी २५० रुपये शुल्क भरावे लागेल. याचे पेमेंट ऑनलाईन माध्यमातून करता येईल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे. आयआयटी कानपूरने भरतीच्या नोटिफिकेशनद्वारे शुल्क सवलतीचा तपशील देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XbJuEJ
via nmkadda