भरती परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज Rojgar News

भरती परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे/नाशिक 'आरोग्य विभागाच्या 'क' गटाची परीक्षा येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर) दोन सत्रांत होणार आहे. राज्यात या भरती प्रक्रियेंतर्गत गट-क संवर्गाची २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाची ३ हजार ४६६ अशी एकूण ६ हजार २०५ पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यांत २४ सप्टेंबर रोजी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते; मात्र त्या वेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. आता रविवारी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विभागात ३१ हजार ९५१ अर्ज पुणे विभागातील १८ संवर्गांच्या रिक्त जागांसाठी ३१ हजार ९५१ अर्ज आले आहेत. त्यापैकी २५ हजार ६३३ उमेदवारांनी (८० टक्के) परीक्षेचे प्रवेशपत्र 'डाउनलोड' केले असून, उर्वरित उमेदवारांच्या मोबाइलवर संदेश पाठवून प्रवेशपत्र 'डाउनलोड' करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,' अशी माहिती सहाय्यक संचालक व परीक्षेचे मुख्य अधिकारी डॉ. संजय देशमुख यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागातील 'क' आणि 'ड' गटातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी भरती परीक्षा घेण्यासाठी आरोग्य विभागाने 'न्यास कम्युनिकेशन' या खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. गेल्या महिन्यांत २४ सप्टेंबर रोजी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते; मात्र त्या वेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या परीक्षेची जय्यत तयारी केली आहे. पुण्यातील १२३ केंद्रांवर सकाळी दहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशा दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेची तयारी - पुणे परिमंडळातील 'क' गटाच्या १८ संवर्गांच्या २३६ रिक्त पदांसाठी भरती - पुणे परिमंडळातून परीक्षेसाठी ३१ हजार ९५१ अर्ज प्राप्त - पुण्यासह परिमंडळातील सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून एकूण एक लाख सात हजार ३३६ उमेदवार - सकाळच्या सत्रात पुणे जिल्ह्यात ३४ हजार ४७३ उमेदवारांची परीक्षा - दुपारच्या सत्रात पुणे, सातारा व सोलापूरमध्ये ७२ हजार ६६३ उमेदवार परीक्षेला बसणार - दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिकाची व्यवस्था नाशिकमध्ये ६८ हजार ६८६ उमेदवार नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा देणार असून एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था केल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी शुक्रवारी दिली. परीक्षा प्रक्रियेबाबत पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ..त्या पदांसाठी अहमदनगरलाच परीक्षा आरोग्य विभागाच्या या भरतीमध्ये पुणे ब्युरो कार्यालयातील केमिकल असिस्टंट, सांख्यिकी सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक या चार संवर्गाची परीक्षा अहमदनगर जिल्ह्यात होत असून, त्या पदांचे पुणे ब्युरो कार्यालय हेच नियुक्ती कार्यालय आहे. त्यामुळे त्या पदांसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील उमेदवारांना अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश पत्रे मिळालेली आहेत. ▪️उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ कार्यालयात मे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीने दोन प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vDCai2
via nmkadda

0 Response to "भरती परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel