TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात भरती, ३५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

ICAR-DOGR Recruitment 2021: कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय ( or DOGR) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. शैक्षणिक आर्हता कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या भरतीअंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या २ जागा भरण्यात येणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवाराकडे जेनेटिक्स अॅण्ड प्लांट बिडींग/ अॅग्रीकल्चर/ बायोटेक्नोलॉजी/ हॉर्टीकल्चर/ वेजिटेबल सायन्समध्ये पदव्युत्तर डिग्री असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ आणि कमाल वय ४५ वर्षे असणे गरजेचे आहे. पगार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३५ हजार पर्यंत दरमहा पगार देण्यात येईल. कालावधी ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्प संपण्याच्या मुदतीपर्यंत असणार आहे. उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता पाहून कामाचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढविण्यात येऊ शकतो. येथे पाठवा अर्ज उमेदवारांनी आपला अर्ज recruitment.dogr@icar.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. २८ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज शुल्क उमेदवार यापूर्वी कुठे नोकरी करत असेल तर त्या संस्थेतून ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने शिक्षण, वयोमर्यादा हे तपशील तपासायला हवे. पुणे ICAR-DOGR हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X5zkWj
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या