भारती विद्यापीठात विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

भारती विद्यापीठात विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Bharti University Recruitment: पुणे येथील भारती विद्यापीठात( Bharti University) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठातर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. भारती विद्यापीठात होणाऱ्या पदभरती अंतर्गत सिनिअर सिव्हिल इंजिनीअर (Senior Civil Engineer), सिनिअर आर्किटेक्ट (Senior Architect) या पदांच्या रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. २ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सिनिअर सिव्हिल इंजिनीअर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनिअर म्हणून पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पुणे आणि इतर साईट्सवर काम करावे लागणार आहे. आपल्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी योग्य ताळमेळ राखून काम करावे लागणार आहे. सिनिअर आर्किटेक्ट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्टची पदवी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे आर्किटेक्ट म्हणून दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पुणे आणि इतर साईट्सवर काम करावे लागणार आहे. आपल्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी योग्य ताळमेळ राखून काम करावे लागणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सचिव, भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे ४११०३० या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचून त्यानंतरच अर्ज करावा. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची काळजी उमेदवारांना घ्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GaPzCU
via nmkadda

0 Response to "भारती विद्यापीठात विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel