आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

IT Department : आयकर विभागात काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. आयकर विभागातर्फे असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आणि स्टेनोग्राफर ग्रेड -२ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ५ ऑक्टोबरला आयकर विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, तीनही पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या गुणवान खेळाडूंकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे. असा करा अर्ज उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर incometaxindia.gov.in जा. त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या 'व्हॉट्स न्यू' सेक्शनमध्ये संबंधित जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. या लिंकवरुन उमेदवार आयकर विभाग, दिल्ली भरती २०२१ ची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्यासाठी नमुना फॉर्म जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन, मागितलेली कागदपत्रे सोबत जोडावी. या पदभरतीअंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफची ५ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. तर टॅक्स असिस्टंटची ११ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त ८००० शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे. स्टेनोग्राफर ग्रेड २ची ५ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ८० शब्द प्रति मिनिटच्या वेगाने १० मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये ६५ शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी आपला अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत आयकर उपायुक्त (हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर -३७८ ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली - ११०००२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dg0FnV
via nmkadda

0 Response to "आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel