Advertisement

Recruitment 2021: पदवीधर असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मुंबईतील ( Mumbai)येथे काम करण्याची संधी आहे. संस्थेतर्फे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये सचिवालय सहाय्यक () पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता सेक्रेटरीयल असिस्टंट या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. ४० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड तसेच शॉर्टहॅंडचे शिक्षण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित विषयातील अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना डेटा एंट्रीसाठी कागदपत्रे, साहित्य आणि माहिती गोळा करावी लागणार आहे. डिजिटल डेटाबेसमध्ये माहिती गोळा करणे, अपडेट करणे, त्याचा नियमित बॅकअप घ्यावा लागेल. ऑफिसमधील योग्य त्या कागदपत्रांचे स्कॅनिंग किंवा छपाई अशी कारकुनी कामे करणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करावी लागणार आहेत. पगार सेक्रेटरीयल असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १२ हजार ५०० रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांनी १४ ऑक्टोबर पर्यंत रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, हिरानंदानी गार्डन, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, पवई (मुंबई) ४०००७६ वर अर्ज पाठवायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iJRrbL
via nmkadda