एलआयसीमध्ये भरती, ७५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

एलआयसीमध्ये भरती, ७५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

LIC Recruitment 2021: जीवन विमा महामंडळ (LIC)मुंबई येथे मुख्य वित्त अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरायचा आहे. एलआयसीच्या पदभरती अंतर्गत मुख्य वित्त अधिकारी पदाची एक जागा भरली जाणार आहे. मुंबई हे कामाचे ठिकाण असणार आहे. यासाठी उमेवाराचे MBA शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्यानुसार co_ personnel@licindia.com या ईमेलवर पाठवायचा आहे. १२ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही गोंधळ आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. IBPS मध्ये विविध पदांची भरती बँकिंग कर्मचारी निवड संस्थेतर्फे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. IBPS च्या या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, फॅकल्टी रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, आयटी इंजिनीअर (डेटा सेंटर), आयटी डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर (फ्रंटएंड, बॅकएंड) या पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊन तपशील तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १४ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या कालावधीतनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. यामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल. महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख- १ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3onIsAT
via nmkadda

0 Response to "एलआयसीमध्ये भरती, ७५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel