Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-06T19:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पेट परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात Rojgar News

Advertisement
MU Exam 2021: मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या पेट परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास दिनांक ६ ऑक्टोबर पासून सुरूवात करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मानव्यविद्या शाखेतील २६ विषय, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ७ विषय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३० विषय आणि आंतरविद्याशाखेतील १६ विषय अशा एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मार्च २०२१ मध्ये झालेल्या ऑनलाइन पेट परीक्षेसाठी १३ हजार ४५२ एवढे विद्यार्थी प्रवेशित झाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DlgVUC
via nmkadda