Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-29T08:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या सेमिस्टर १ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
ICSE, ISC Board Exam 2021: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांचे वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला यासंदर्भात सविस्तर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे. आयसीएसईने परीक्षेदरम्यान जाहीर केलेल्या सूचनांचे पालन सर्व विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org जाऊन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात. बारावीची सेमिस्टर १ परीक्षा २२ नोव्हेंबरपासून आयसीएसईद्वारे जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार, इयत्ता बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NEP) च्या सूचनेनुसार ही परीक्षा घेतली जाईल. सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातील. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांचा असेल. पहिला पेपर इंग्रजीचा दुसरा पेपर असेल आणि शेवटी अकाउंट्सचा पेपर २० डिसेंबरला होईल. दहावी सेमिस्टर १ ची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून दहावी सेमिस्टर १ परीक्षेसाठी आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इयत्ता दहावीची परीक्षा देखील बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जातील. परीक्षेचा कालावधी हिंदी, गणित, रेखाचित्र आणि भाषा या विषयांचा कालावधी १ तास ३० मिनिटे असेल. इतर विषयांचा कालावधी १ तासांचा असेल. आयएससीई सेमिस्टर १ च्या परीक्षा २० नोव्हेंबर रोजी इंग्रजी पेपर १ ने सुरू होतील. शेवटचा पेपर १६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3170v4x
via nmkadda