Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-28T09:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्कूलबस चालकांसाठी नियमावली जारी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, ठाणे जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस ऑपरेटरसाठी आरटीओने मानक कार्यपद्धती (SOP) तयार केली असून याचे पालन करण्याचे आवाहन ठाणे आरटीओने केले आहे. पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने ही एसओपी तयार केली आहे. स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येक फेरीअंती बसचे निर्जंतुकीकरण अनिवार्य आहे. स्कूल बसचालक आणि अटेंडन्ट यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. चालक, अटेंडन्ट यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, विद्यार्थ्यांच्या वापरासाठी बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. मास्क परिधान न केलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त ठेवण्यात आलेल्या मास्कमधून मास्क वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच अटेंडन्ट यांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देताना त्यांचे हात सॅनिटायझरने निर्जंतुक करून घ्यावेत, विद्यार्थ्यांचे थर्मल गनद्वारे तापमान मोजावे. एखाद्या विद्यार्थ्याला ताप, सर्दी खोकला आदी प्रकारची लक्षणे दिसताच, त्याला बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. अशा विद्यार्थ्यास त्वरित त्याच्या पालकांच्या ताब्यात द्यावे, आदी विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत. बसमध्ये एका आसनावर प्रत्येकी एक या प्रमाणे आणि वाहनाच्या आसन क्षमतेच्या जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी असेल. स्कूल बसमध्ये चढताना आणि उतरताना विद्यार्थी सुरक्षित वावराचे पालन करतील याची दक्षता अटेंडन्ट तसेच चालकाने घ्यावयाची आहे. स्कूल बसच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. वातानुकूलीत बसेसमध्ये ४ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान राखावे. शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये कचरा फेकू देऊ नये, त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या आणि स्कूल बस स्वच्छ राखण्याच्या सुचना द्याव्यात. स्कूल बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल, असेही या एसओपीमध्ये नमूद आहे. या एसओपीचे तंतोतंत पालन करण्यात करण्याचे आवाहन ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nyYiGJ
via nmkadda