Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T14:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सैनिकी शाळांमध्ये सामान्यज्ञान विषय घेण्यास मान्यता Rojgar News

Advertisement
in : इयत्ता अकारीव आणि बारावी सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजनेमधील 'सामान्यज्ञान' हा विषय सैनिकी शाळांमध्ये पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. हा विषय सैनिकी शाळांमध्ये सुरु ठेवण्यासंदर्भातील मागणी गेली अनेक वर्षे होत होती. त्यावर आज बैठकीत निर्णय घेण्यात आला. संबंधित विषय हा पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यास बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. सामान्यज्ञान या विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाची सवय रुजण्यास मदत होते. तसेच या विषयामुळे स्पर्धा परीक्षा देण्याइतपत विद्यार्थी सक्षम बनण्यास मदत मिळेल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समृद्ध राष्ट्रीय संस्कृती आणि वारसा याविषयीची जागरूकता निर्माण होईल तसेच नेतृत्व गुण वाढीस देखील चालना मिळेल असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय निर्माण होण्यास मदत करणे, एनडीए आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी क्षमता विकसित करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, सैन्य दलात सामील होण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे ही सैनिकी शाळांमध्ये सामान्यज्ञान शिकविले जाण्याची प्रमुख उद्दीष्ट्ये आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सशस्त्र सेना आणि निमलष्करी दलात अधिकारी भरतीसाठीचे ज्ञान मिळणे, त्यांचे नेतृत्व गुण वाढवण्यास मदत करणे, समृद्ध राष्ट्रीय संस्कृती आणि वारसा याविषयीची जागरूकता निर्माण करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना, घडामोडी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित होण्यास यामुळे मदत होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ne9doW
via nmkadda