TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नीट यूजी २०२१ निकाल लवकरच; महत्वाची कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घ्या Rojgar News

NEET UG 2021: नीट यूजी २०२१ च्या निकालाची घोषणा लवकरच होणार आहे. निकाल तयार असून NAT तर्फे केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यानंतर कॉलेजच्या स्वतःच्या कट ऑफ लिस्ट आधारे प्रवेश दिला जातो. यासाठी दोन प्रकारचे काऊन्सेलिंग केले जातात. एक काऊन्सेलिंग अखिल भारतीय कोटा (AIQ) च्या आधारे केले जाते. तर दुसरे काऊन्सेलिंग राज्यांकडून त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी बनवून केले जाते. गुणवत्ता यादी तयार उमेदवाराला मिळालेल्या गुणांवर आधारित, NTA, AIQ (All India Quota)द्वारे १५ टक्के जागांसाठी मेरीट लिस्ट तयार केली जाते. एनटीए राज्य कोट्यातील उर्वरित ८५ टक्के जागांच्या काऊन्सेलिंगसाठी सर्व राज्यांतील पात्र उमेदवारांची यादी संबंधित विभागाशी शेअर करते. याआधारे राज्ये त्यांची गुणवत्ता यादी तयार करतात. काऊन्सेलिंगसाठी नोंदणी उत्तीर्ण उमेदवारांना काऊन्सेलिंगसाठी नोंदणी करावी लागते. ज्या अंतर्गत उमेदवार त्यांच्या आवडीची महाविद्यालये आणि अभ्यासक्रम निवडतात. त्यानंतर नीट २०२१ मधील गुणांच्या आधारे सीट उपलब्धता, भरलेले पर्याय, आरक्षण निकष इत्यादींच्या आधारे जागा वाटप केल्या जातात. याअंतर्गत महाविद्यालये त्यांच्या स्तरावर जागांची उपलब्धता लक्षात घेऊन कट ऑफ लिस्ट तयार करतात. ज्यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला कॉलेजचे वाटप केले जाते. काऊन्सेलिंगसाठी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी काऊन्सेलिंगसाठी जाताना महत्वाची कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे. नीट २०२१ प्रवेशपत्र, नीट २०२१ निकाल किंवा रँक लेटर, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, सरकारी फोटो ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) सोबत नेणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास ते देखील द्यावे लागेल. आरक्षणाचे नियम ऑल इंडिया कोट्यातील १५ टक्के जागांच्या आरक्षणाचा प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गांचा समावेश आहे. या अंतर्गत ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के, ईडब्ल्यूएसला १० टक्के, एससी प्रवर्गाला १५ टक्के, एसटीला ७.५ टक्के आणि पीडब्ल्यू प्रवर्गातील उमेदवारांना ५ टक्के आरक्षण मिळते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Co5dZw
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या