भरती परीक्षेत तुरळक प्रकार वगळता परीक्षा सुरळीत; आरोग्य विभागाचा दावा Rojgar News

भरती परीक्षेत तुरळक प्रकार वगळता परीक्षा सुरळीत; आरोग्य विभागाचा दावा Rojgar News

राज्यात रविवारी २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य परीक्षेच्या वेळी पुणे, नाशिकमधील केंद्रांवर गोंधळ उडाला होता. आरोग्य विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील एकूण १,०२५ केंद्रांपैकी १० केंद्रांवर काही घटना घडल्या. साकीनाका येथे एक उमेदवाराने परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका घेतल्याचा संशय आल्याने पोलीस तपास करीत आहेत, अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे. कोणत्या केंद्रात गोंधळ उडाला वा गैरप्रकार झाला, याबाबतही आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार, ३ परीक्षा केंद्रात परीक्षा उशिराने सुरू झाली. या ठिकाणी उमेदवारांना वाढीव वेळ देण्यात आला. एका परीक्षा केंद्रातील ३६ उमेदवारांना दुसऱ्या पदांच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. या उमेदवारांच्या परीक्षेबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येईल. पेपरफुटीची अफवा काही परीक्षा केंद्रांमध्ये पेपर फुटल्याची अफवा पसरवून उमेदवारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. विभागाचे अधिकारी आणि पोलीसांच्या पुढाकाराने परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आली. साकीनाका येथे एक उमेदवाराने परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका घेतल्याचा संशय आल्याने पोलीस तपास करीत आहेत. नाशिकमधील एका केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिकांची पेटी दुसऱ्या केंद्रावर गेली. त्यानंतर प्रश्नपत्रिकांची उपलब्ध करून परीक्षा घेण्यात आली आणि येथेही उमेदवारांना अतिरिक्त वेळ देण्यात आला. १८ हजार उमेदवार अनुपस्थित गट क च्या २२ संवर्गांसाठी ४६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. पहिल्या सत्रात १८ हजार ८७ परीक्षार्थींपैकी ६,८१७, तर दुसऱ्या सत्रात १८ हजार १८३ पैकी १० हजार ९५७ परीक्षार्थी परीक्षेला बसले. म्हणजेच १८ हजार ४९६ उमेदवार अनुपस्थित राहिले. दोन केंद्रांवर सकाळच्या सत्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली. न्यासा कंपनीने केलेल्या नियोजनात अक्षम्य ढिसाळपणा दिसून आल्याने त्यांच्या नियोजनशून्य कारभाराची योग्य पातळीवर दखल घेतल्याची माहितीही गांडाळ यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b6890N
via nmkadda

0 Response to "भरती परीक्षेत तुरळक प्रकार वगळता परीक्षा सुरळीत; आरोग्य विभागाचा दावा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel