Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T09:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अफगाण विद्यार्थ्यांना हवा पीएचडी प्रवेश, जेएनयू प्रशासनाने दिली 'अशी' प्रतिक्रिया Rojgar News

Advertisement
JNU Admission 2021: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पीएचडी प्रवेशासाठी अफगाणच्या विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर प्रशासनातर्फे उत्तर देण्यात आले आहे. पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये अफगाण नागरिकांसाठी अतिरिक्त जागा वाटप करण्याचे आवाहन जेएनयूकडे करण्यात आले. यावर्षी अनेक अफगाण विद्यार्थ्यांनी जेएनयूमधून पीजी केले आहे. ते विद्यार्थी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीमुळे तेथे परत जाऊ शकत नाहीत. अशावेळी विद्यार्थ्यांची पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया स्वत:साठी सोपी करावी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी जेएनयू विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. यावर जेएनयूमधील प्रवेश प्रक्रियेचे संचालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दरवर्षी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेते. याचा शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रवेश धोरण यूजीसी आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केले आहे. विविध प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यासंबंधी विद्यापीठाचे नियम आहेत. त्याआधारे सामान्य श्रेणी, SC श्रेणी, ST, OBC, EWS, PWD आणि परदेशी नागरिकांसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाते.' अफगाण विद्यार्थी त्यांच्या जीवनात एक विलक्षण संकटातून जात आहेत. विद्यापीठाने त्यांच्या दुरवस्थेकडे सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन ठेवून त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे असे सध्या भारतात राहणाऱ्या अफगाणिस्तानमधील विद्यार्थी शाहदाबने म्हटले आहे. जेएनयू विद्यापीठाच्या प्रवेश धोरणानुसार, जेएनयूतर्फे सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या मुलांसाठी ५ टक्के अतिरिक्त जागा देण्यात येते. याव्यतिरिक्त यूजी, पीजी, अर्धवेळ कार्यक्रमांसाठी जागा निर्धारित केल्या आहेत. परंतु बीटेक, एमएससीसाठी. (बायोटेक्नोलॉजी), एम.एस्सी. (कॉम्प्युटेशनल अॅण्ड इंटीग्रेटीव्ह सायन्सेस), एमबीए आणि पीएचडीमध्ये कोणतेही आरक्षण नाही. पीएचडीसाठी परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश यूजीसी २०१६च्या नियमानुसार केले जातात. भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर कोणत्याही विषयात जागा रिक्त राहिल्यास त्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांना पीएचडीमध्ये प्रवेश दिला जातो असे जेएनयूच्या प्रवेश संचालकांनी स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vFQHK5
via nmkadda