पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर Rojgar News

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी (Police Bharti Exam 2021) २३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेली लेखी परीक्षा नियोजनाअभावी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही लेखी परीक्षा १९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुपारी तीन ते साडेचार या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेचे नियोजन होऊ न शकल्याने ऐन वेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. पुणे ग्रामीण व शहर पोलीस दलाचे विभाजन करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर २०१९मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. मात्र, करोना महामारी व लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया रखडली. सध्या राज्यात व शहरातही करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे; निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात विविध शहरांतील पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून १७ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानंतर २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी एका त्रयस्थ खासगी कंपनीकडे देण्यात आली. मात्र, परीक्षार्थी पावणेदोन लाखांपेक्षा जास्त असल्याने नियोजन करणे शक्य झाल्याचे दिसून येत नाही. नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही लेखी परीक्षा १९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परीक्षार्थ्यांना भुर्दंड... पोलीस भरतीसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी येणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रवासाचे, राहण्याचे नियोजन करावे लागते. हजारो परीक्षार्थ्यांनी त्याचे नियोजन केले होते. मात्र, ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पोलिस शिपाई पदाच्या जागा सर्वसाधारण - १७६ महिला - २१६ खेळाडू - ३८ प्रकल्पग्रस्त - ३८ भूकंपग्रस्त - १४ माजी सैनिक - १०७ अंशकालीन पदवीधर - ७१ पोलिस पाल्य - २२ गृहरक्षक दल - ३८ परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन केले जात आहे. परीक्षार्थींना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉल तिकीट, परीक्षा केंद्र याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. त्याचे परिपूर्ण नियोजन करता यावे; म्हणून संबंधित व्हेंडर कंपनीने वेळ वाढवून मागितली. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. - कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pvFvi2
via nmkadda

0 Response to "पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel