Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-10-11T06:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यूपीएससीतर्फे युवा अधिकारीसह विविध पदांची भरती Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत डेटा प्रोसेसिंग सहाय्यक (Data Processing Assistant), खासगी सचिव (Private Secretary), भारतीय माहिती सेवेचा वरिष्ठ दर्जा (Indian Information Service Senior Level), कनिष्ठ वेळ स्केल (Junior Time Scale), () ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांअतर्गत एकूण ५६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडूनऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. २८ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डेटा प्रोसेसिंग सहाय्यक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लीकेशन. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे. अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, अॅसिड विक्टीम अशा उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी ३० वर्ष ही वयोमर्यादा आहे. खासगी सचिव पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, १०० शब्द प्रति मिनिट टायपिंग तसेच टिक्टेशन येणे गरजेचे आहे. सिनिअर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस पदाच्या २० जागा भरण्यात येणार आहेत. यातील एक जागा ही शारिरीक अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. ही भरती भाषेच्या आधारे होणार आहे. हिंदीसाठी ६, इंग्रजीसाठी ६, तेलगुसाठी १, मराठीसाठी २, बंगालीसाठी २, तामिळसाठी २, काश्मिरीसाठी १ जागा भरण्यात येणार आहे. ज्युनिअर टाइम स्केल पदाच्या २९ जागा भरण्यात येणार आहेत. यातील दोन जागा शारिरीक अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि सोशल वर्क /लेबर लॉ/ लेबर रिलेशनमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. युवा अधिकारी या पदाच्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यातील एक जागा ही शारिरीक अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री आणि मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे. पदांसाठी लागणारी इतर शैक्षणिक आर्हता आणि पगार पदानुसार बदलणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जासोबत २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. २८ ऑक्टोबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YGpomQ
via nmkadda