Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T08:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

लार्सन अँड टुब्रोमध्ये ५ हजार ५०० फ्रेशर्सना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
Larsen & Toubro : इन्फोटेक (LTI NSE -3.30 %) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ५,५०० फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. या कंपनीतर्फे मार्केटमधील वाढती मागणी ओळखून वेगाने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे ही भरती आधीच्या टार्गेटपेक्षा १ हजारहून अधिक आहे. ईएसजी आणि सायबरसुरक्षा सारख्या नवीन क्षेत्रांतील व्यापक मागणी पाहता LTI नवीन नोकर्‍या देत आहे. यासाठी एलटीआयला नॉन-टेक हायरिंग, इन-हाऊस टॅलेंटचे अपस्किलिंग आणि इतर अनेक उद्योगांद्वारे एक मोठा टॅलेंट ब्रीज तयार करायचा असल्याचे LTIचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापन दिग्दर्शक संजय जलोना म्हणाले. मिड-टियर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ५० दशलक्ष कमाईसह एक ग्राहक, त्याच्या २० दशलक्ष डॉलर्सच्या श्रेणीमध्ये तीन ग्राहकक आणि १० दशलक्ष डॉलर्सच्या यादीत पाच ग्राहक जोडले आहेत. दरम्यान 'आम्ही ४५०० फ्रेशर्स भरण्याची घोषणा पहिल्या तिमाहीत केली होती त्यामध्ये आता १ हजार अधिक फ्रेशर्स भरणार असल्याचे' जलोना म्हणाले. दुसऱ्या तिमाहीत कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण (attrition rate) १५.२ टक्क्यांवरून १९.६ टक्के इतका वाढला होता. तरीही दुसऱ्या तिमाहीत LTI कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजारपासून ४२ हजार ३८२ कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचली असेही ते म्हणाले. जगभरात कर्मचाऱ्यांकडून अधिक राजीनामे आणि क्षोभ पाहायला मिळत आहे. हे आणखी तीन वर्षे असेल सुरु राहील असे जलोना पुढे म्हणाले. मागील आर्थिक वर्षात जेव्हा इतर कंपन्यांची भरती प्रक्रिया मंदावली होती तेव्हा देखील एलटीआयमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरु होती. २०२१ या आर्थिक वर्षात एलटीआयमध्ये ९.५ टक्के इतकी कर्मचाऱ्यांची वाढ झाली. तरी देखील एलटीआय कंपनीने भरती सुरुच ठेवली होती असेही ते म्हणाले. स्पर्धेत राहण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकणाऱ्या लोकांसाठी एक रोमांचक कार्यस्थळ निर्माण करायचे आहे.अशा प्रकारची प्रतिभा निर्माण करण्यासाठी काही वर्षे लागतील परंतु त्यादरम्यान आम्ही आमच्याकडील प्रतिभेचा पूर्ण वापर करु असेही म्हणाले. एलटीआयकडे प्रतिभा सुधारण्यासाठी काही लीव्हर्स आहेत. जे फ्रेशर्सची नियुक्ती करतात. तसेच कंपनीतील सध्याच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देखील देत आहे. 'नॉन टेक्निकल कर्मचाऱ्यांना नियुक्त करून सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात (for technical roles) कसे ठेवू शकतो याचे मूल्यमापन करत असल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vJ88tq
via nmkadda