Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T07:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एसबीआय पीओच्या २०५६ जागा रिक्त; अंतिम मुदत संपण्याआधी करा अर्ज Rojgar News

Advertisement
SBI PO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने पीओ पदावर भरतीसाठी २५ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या रिक्त पदांसाठी () अर्ज करू शकले नाहीत, ते अधिकृत वेबसाइट- sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी अर्ज प्रक्रिया ५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदावर प्रसिद्ध झालेल्या या रिक्त पदासाठी पूर्व परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येईल. या रिक्त पदांद्वारे एकूण २०५६ पदांची भरती (SBI PO Recruitment 2021)केली जाईल. SBI PO Notification 2021: असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरील करिअर सेक्शनमध्ये जा. या विभागात दिलेल्या SBI PO 2021 नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा. अर्जाचे पेज खुले होईल. उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा आणि अर्ज सबमिट करा. पीओ २०२१ अर्जासोबत उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एसबीआयने जाहीर केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भरती नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ५ सरकारी कंपनीत भरती सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असलेल्या आणि केंद्र, राज्य सरकारच्या विविध भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकाराअंतर्गत येणाऱ्या ५ मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया २५ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या भरतींमध्ये, कर्मचारी निवड आयोग (SSC) केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये ३२२०, भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये २०५६ प्रोबेशनरी ऑफिसर, भारतीय नौदलामध्ये नाविक (AA आणि SSR) च्या २५०० जागा, आसाम रायफल्समध्ये भरतीचा समावेश आहे. तसेच १२३० टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांची भरती तसेच महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा २०२१ द्वारे २९० पदांच्या भरतीचा समावेश आहे. या सर्व भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BcRZxp
via nmkadda