लसीकरणाच्या 'डेटा एंट्री'ची जबाबदारी शिक्षकांवर Rojgar News

लसीकरणाच्या 'डेटा एंट्री'ची जबाबदारी शिक्षकांवर Rojgar News

: जिल्ह्यातील लसीकरणाच्या दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक डेटा एन्ट्री ऑपरेटरची जिल्ह्यात मोठी कमतरता निर्माण झाल्याने थेट शालेय शिक्षकांनाच या कामाला जुंपण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांवर लसीकरण केंद्रांवरील ''चे काम देण्याचा फतवा जिल्हा परिषदेने काढला आहे. त्यानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील एक हजार शिक्षक मुलांना ऑनलाइन धडे देण्याऐवजी डेटा एन्ट्रीच्या आकडेमोडीत व्यग्र झाले आहेत. संपूर्ण राज्यात लसीकरणाला वेग येण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मिशन कवच कुंडले' या मोहिमेंतर्गत लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या वर्गाचे लसीकरण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधींना आवाहन करून लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन केले आहे. लसीकरणाला वेग देऊन त्याच्या रोजच्या नोंदींचे काम केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर करायचे असल्याने त्यासाठी आवश्यक डेटा एन्ट्री ऑपरेटरची जिल्ह्यात सध्या कमतरता आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाचशेहून अधिक लसीकरण केंद्रे आहेत. केंद्राच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी प्रत्येकी दोन ते तीन 'डेटा एंट्री' ऑपरेटर्सची गरज भासते. सध्या या ऑपरेटर्सची कमतरता असल्याने लसीकरण मोहिमेलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी शालेय शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. पहिली ते चौथीमधील 'तंत्रस्नेही' शिक्षकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाचशे केंद्रावर एक हजार शिक्षक सोमवारपासून डेटा एन्ट्रीचे काम करणार आहेत. शिक्षणात खंड; परीक्षांचे काय? जिल्ह्यात पाचवीपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. एकावेळी एक हजार शिक्षक शैक्षणिक कामाऐवजी डेटा एन्ट्रीच्या कामात व्यग्र झाले; तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने या महिनाअखेरपर्यंत सर्वच शाळांना सुट्टी लागणार असून तत्पूर्वी चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, वर्गात शिक्षकच नसतील, तर त्यांच्या परीक्षा तरी कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११ हजार - प्राथमिक शिक्षक एक हजार - तंत्रस्नेही शिक्षक जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये तंत्रस्नेही शिक्षक कार्यरत आहेत. पहिली ते चौथीच्या शाळा बंद असून त्या शाळांमधील तंत्रस्नेही शिक्षकांनाच आता लसीकरण केंद्रावर गरजेनुसार डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iVj81k
via nmkadda

0 Response to "लसीकरणाच्या 'डेटा एंट्री'ची जबाबदारी शिक्षकांवर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel