Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T08:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
HSC Supplementary Exam Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या परीक्षेच्या निकालाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत सायन्स, ऑर्ट, कॉमर्स आणि व्होकेशनल या शाखांतील नवीन अभ्यासक्रमानुसार पुनर्परीक्षार्थी म्हणून २१०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८०९ विद्यार्थी परीक्षेत उपस्थित होते आणि ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी २५.८७ टक्के आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सायन्स, ऑर्ट, कॉमर्स आणि व्होकेशनल या शाखांतील जुन्या अभ्यासक्रमानुसार पुनर्परिक्षार्थी म्हणून१२, ५३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२, १६० विद्यार्थी परिक्षेस उपस्थित असून ३३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल २७.३१ टक्के इतका लागला आहे. कुठे पाहता येईल निकाल? राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. मंडळाच्या पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. गुणपडताळणी कधी आणि कुठे? ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांक व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या संकेतस्थळावर यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध आहे. या प्रक्रियांचे शुल्क देखील ऑनलाइन माध्यमातूनच भरायचे आहे. महत्वाच्या तारखा गुणपडताळणीसाठी अर्ज - २१ ऑक्टोबर २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२१ उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज - २१ ऑक्टोबर २०२१ ते ९ नोव्हेंबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AZkNJE
via nmkadda